आज सकाळी जरा लवकरच उठली. हरतालिका , मग पूजा आरती सगळं उरकुन ऑफिसला जायचं होता . फराळ करून ऑफिसला पोचली तर रिसेपशन लाच टीम मेंबर भेटली .
ती :"काय मॅडम आज बर्थडे आहे वाटतं ?"
मी : "नाही ग , हरतालिका आहे ना मग जरा मूड होता ट्रॅडिशनल घालायचा . आवडतं मला कधीतरी . "
ती : "झालं ना लग्न! भेटला की हवा तसा नवरा ! मग आता काय ग उपास करतेस तु ?"
मी : "अग लग्न आणि नवरा म्हणुन नाही ग , ह्या सगळ्या ट्रॅडीशन्स आपण विसरून जाऊ नाहीतर . कितीतरी सण आहेत ग जे फक्त कालनिर्णय मध्ये आहेत म्हणुन माहित आहेत आपल्याला . आपणच आळस केला आणि ह्या सगळ्या गोष्टींना ओल्ड ट्रॅडीशन्स म्हटलं तर पुढच्या पिढीला कसं माहित होईल हे सगळं . "
ती : "हाहाहाहा खरंच तु अगदीच जुनाट विचारांची आहेस . जग कुठे पोचलंय आणि तु अजुनही ह्या सगळ्यात अडकुन पडली आहेस . "
हे सगळं बोलून पुढच्याच क्षणी ती निघुन पण गेली .
मला खरतर नाही आवडलं तीच मत पण तिचा स्वभाव तिचे विचार ह्यावर मी नाही कंट्रोल ठेवु शकत आणि तसं करावं तरी का . प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे . आपलं मत मांडण्याचा हक्क आहे .
पण तरीही समाजात वावरताना आपले वागणे बोलणे कुठेतरी मॅटर नक्कीच करत . घरातल वातावरण नकळत का होईना तेच संस्कार मुलांवर करत असतं . आपण अगदी सहजच बोलतो , "आमुक आमुक घरातली लोक खुपच भांडखोर आहेत . तमुक तमुक घरात खुपच धार्मिक लोक आहेत . " थोडक्यात काय , आपले विचार आपल्या वागण्यातुन प्रतीत होतात .
मग असं म्हणायचं का , की एका घरातली सगळी माणसं सारख्याच स्वभावाची असतात ? नक्कीच नाही .
माणसाचा स्वभाव हा त्याच्या विचार आणि संस्कारानी नक्कीच बदलु शकतो पण प्रत्येक माणसाचे काही डॉमिनेटींग गुण असतात जे त्याच्या व्यक्तिमत्वाला दुसऱ्यापासून वेगळं करतात .
खरंतर स्वभाव आणि विचार ह्या दोन खुपच वेगळ्या गोष्टी आहेत . बघायला गेलं तर दोन्हीही गोष्टी माणसामाणसाप्रमाणे बदलतात . उपवास करणे हा माझ्यासाठी चांगला विचार आहे पण कदाचित माझ्या मित्रासाठी ते अंधश्रद्धा असु शकत . कधी कधी स्वभावाने खुप चांगली वाटणारी माणसं विचारांनी तेवढी परिपक्व असतील हे कशावरून? एखाद्याचा स्वभाव रागीट आहे म्हणजे तो माणुस कधी चांगला विचार करतच नाही का?
थोडक्यात काय व्यक्ती तेवढ्या प्रकृती . कुणाचा स्वभाव आपल्याला आवडतो तर कुणाचे विचार . शेवटी माणुस हे तर फक्त प्यादं आहे ना ह्या आयुष्याच्या खेळामधलं .

No comments:
Post a Comment