Tuesday 11 July 2017

वसुधैव कुटुंबकम

         ऑफिसची वेळ म्हणजे ट्रॅफिक तर असणारच . त्यात शाळकरी मुलांची शाळेची लगबग. आज सकाळी सिग्नल क्रॉस करताना असाच  चार - पाच मुलांचा ग्रुप माझ्या गाडीसमोर आला. अगदी कचकटून ब्रेक दाबला मी. अगदीच घाबरून गेली होती. त्यांना काही बोलावं अस वाटल पण पुढच्याच क्षणी हसू आलं. सगळ्यांनी एकमेकांचा हात घट्ट पकडलेला. कुणी एक पाऊलही पुढे टाकायला तयार नाही. गाडी थांबल्यावर सगळ्यांनी सोबत धूम ठोकली. 
          त्यांना पाहुन मला माझ्या लहानपणीची एकीचे बळ ही गोष्ट आठवली. सगळे सोबत असले की अशक्य गोष्ट पण साध्य होते. किंवा कुठलंही काम करण्याचं धाडस वाढत. अगदी वारुळात राहणाऱ्या मुंग्या आणी मध गोळा करणाऱ्या मधमाश्यापासुन जंगलात राहणाऱ्या हरणांचा पण कळप असतो. 
           कुटुंब, या शब्दाची जर कुणी डेफिनिशन विचारली तर माहीत नाही माझ्याकडे त्याच करेक्ट उत्तर आहे की नाही.  माझ्या मते ही एक रेलॅटिव्ह टर्म आहे. होय. कुठलाही समुह जो एका सारख्या ध्येयासाठी सोबत राहतो तो समुह कुटुंब असतो. 
            आता बघा ना, आपण एका घरात राहतो, सुख दुःख एकमेकांसोबत शेअर करतो. म्हणजेच आपण दैनंदिन जीवनासाठी हक्काच्या अश्या लोकांसोबत राहतो. ते बनते आपले कुटुंब.  आता समजा आपल्या कुटुंबातील कुणीतरी शेजारच्या गावात कुस्ती स्पर्धेसाठी गेलाय. अगदी झाडुन सगळा गाव त्या व्यक्तीच्या सपोर्ट साठी येते. कारण तिथे माझ्या गावचा विजय झाला पाहीजे असच सगळ्यांना वाटत असत. मग अशा प्रसंगी ते गाव आपल कुटुंब बनत. देशांतर्गत जेव्हा क्रिकेट खेळ सुरु असतो तेव्हा माझा देश हे माझे कुटुंब बनते. 
             थोडक्यात काय, वसुधैव कुटुंबकम !

No comments:

Post a Comment