Tuesday 19 September 2017

ट्रॅफिक सिग्नल

ट्रॅफिक सिग्नल वर थांबुन रोड क्रॉस करणाऱ्यांची लगबग पाहण्याची मजा काही औरच असते . काही सेकंद चा खेळ असतो तो. :)

आज ऑफिसला येताना ट्रॅफिक सिग्नल वर थांबली होती आणि एक छोटा शाळेतला मुलगा रोड क्रॉस करण्याचा प्रयत्न करत होता. वय तस कमीच होता त्याचा पण कॉन्फिडन्स जाम आवडला मला. अगदी आरामात चौकाच्या सेन्टरला ट्रॅफिक हवालदाराशेजारी जाऊन उभा राहिला तो. ट्रॅफिक हवालदाराने थोडा वेळ दुर्लक्ष केला कारण तो वेहिकल्स ला गाईड करण्यात बिझी होता. 

सिग्नल सुटायला काहीच सेकंड होते आणि मी विचार करत होती , आता काही ह्या मुलाला रोड क्रॉस करायला नाही जमणार पण पुढच्याच क्षणी ट्रॅफिक हवालदाराने त्याचा हाथ पकडला अन त्याला रोड च्या दुसऱ्या टोकाला घेऊन गेला. 

काहीतरी मोठं मिळवल्याचा आनंद होता त्या मुलाच्या चेहऱ्यावर. छान हसुन धूम ठोकली पट्ठ्यानं. इकडे जराही विलंब नं करता ट्रॅफिक हवालदार परत आपल्या ड्युटीवर रुजू पण झाला होता. 

हे सगळं बघुन मी मात्र जाम खुश झाली होती. म्हणतात ना दररोज काहीतरी इन्स्पिरेशन हवं असतं आपल्याला, आज ते मला ट्रॅफिक सिग्नलवर भेटलं  होता. :)

                                                                                                                                  
                                                                                                                                            - सौजन्य 
                                                                                                                                      पुणे ट्रॅफिक पोलीस 

Thursday 24 August 2017

आयुष्यावर बोलु काही

आज सकाळी जरा लवकरच उठली. हरतालिका , मग पूजा आरती सगळं उरकुन ऑफिसला जायचं होता .  फराळ करून ऑफिसला पोचली तर रिसेपशन लाच टीम मेंबर भेटली .

ती  :"काय मॅडम आज बर्थडे आहे वाटतं ?"
मी : "नाही ग , हरतालिका आहे ना मग जरा मूड होता ट्रॅडिशनल घालायचा . आवडतं मला कधीतरी . "
ती : "झालं  ना लग्न!  भेटला की हवा तसा नवरा !  मग आता काय ग उपास करतेस तु ?"
मी : "अग लग्न आणि नवरा म्हणुन नाही ग , ह्या सगळ्या ट्रॅडीशन्स आपण विसरून जाऊ नाहीतर . कितीतरी सण आहेत ग जे फक्त कालनिर्णय मध्ये आहेत म्हणुन माहित आहेत आपल्याला . आपणच आळस केला आणि ह्या सगळ्या गोष्टींना ओल्ड ट्रॅडीशन्स म्हटलं तर पुढच्या पिढीला कसं  माहित होईल हे सगळं . "
ती : "हाहाहाहा खरंच तु अगदीच जुनाट विचारांची आहेस . जग कुठे पोचलंय आणि तु अजुनही ह्या सगळ्यात अडकुन पडली आहेस . "

हे सगळं बोलून पुढच्याच क्षणी ती निघुन पण गेली .

मला खरतर नाही आवडलं तीच मत पण तिचा स्वभाव तिचे विचार ह्यावर मी नाही कंट्रोल ठेवु शकत आणि तसं करावं तरी का . प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे . आपलं मत मांडण्याचा हक्क आहे .

पण तरीही समाजात वावरताना आपले वागणे बोलणे कुठेतरी मॅटर नक्कीच करत . घरातल वातावरण नकळत का होईना तेच संस्कार मुलांवर करत असतं . आपण अगदी सहजच बोलतो , "आमुक आमुक घरातली लोक खुपच भांडखोर आहेत . तमुक तमुक घरात खुपच धार्मिक लोक आहेत . " थोडक्यात काय , आपले विचार आपल्या वागण्यातुन प्रतीत होतात .

मग असं म्हणायचं का , की एका घरातली सगळी माणसं सारख्याच स्वभावाची असतात ? नक्कीच नाही .

माणसाचा स्वभाव हा त्याच्या विचार आणि संस्कारानी नक्कीच बदलु शकतो पण प्रत्येक माणसाचे काही डॉमिनेटींग गुण असतात जे  त्याच्या व्यक्तिमत्वाला दुसऱ्यापासून वेगळं करतात .

खरंतर स्वभाव आणि विचार ह्या दोन खुपच वेगळ्या गोष्टी आहेत . बघायला गेलं तर दोन्हीही गोष्टी माणसामाणसाप्रमाणे बदलतात . उपवास करणे हा माझ्यासाठी चांगला विचार आहे पण कदाचित माझ्या मित्रासाठी ते अंधश्रद्धा असु शकत . कधी कधी स्वभावाने खुप चांगली वाटणारी माणसं विचारांनी तेवढी परिपक्व असतील हे कशावरून? एखाद्याचा स्वभाव रागीट आहे म्हणजे तो माणुस कधी चांगला विचार करतच नाही का?

थोडक्यात काय व्यक्ती तेवढ्या प्रकृती . कुणाचा स्वभाव आपल्याला आवडतो तर कुणाचे विचार . शेवटी माणुस हे तर फक्त प्यादं आहे ना ह्या आयुष्याच्या खेळामधलं .



Tuesday 11 July 2017

वसुधैव कुटुंबकम

         ऑफिसची वेळ म्हणजे ट्रॅफिक तर असणारच . त्यात शाळकरी मुलांची शाळेची लगबग. आज सकाळी सिग्नल क्रॉस करताना असाच  चार - पाच मुलांचा ग्रुप माझ्या गाडीसमोर आला. अगदी कचकटून ब्रेक दाबला मी. अगदीच घाबरून गेली होती. त्यांना काही बोलावं अस वाटल पण पुढच्याच क्षणी हसू आलं. सगळ्यांनी एकमेकांचा हात घट्ट पकडलेला. कुणी एक पाऊलही पुढे टाकायला तयार नाही. गाडी थांबल्यावर सगळ्यांनी सोबत धूम ठोकली. 
          त्यांना पाहुन मला माझ्या लहानपणीची एकीचे बळ ही गोष्ट आठवली. सगळे सोबत असले की अशक्य गोष्ट पण साध्य होते. किंवा कुठलंही काम करण्याचं धाडस वाढत. अगदी वारुळात राहणाऱ्या मुंग्या आणी मध गोळा करणाऱ्या मधमाश्यापासुन जंगलात राहणाऱ्या हरणांचा पण कळप असतो. 
           कुटुंब, या शब्दाची जर कुणी डेफिनिशन विचारली तर माहीत नाही माझ्याकडे त्याच करेक्ट उत्तर आहे की नाही.  माझ्या मते ही एक रेलॅटिव्ह टर्म आहे. होय. कुठलाही समुह जो एका सारख्या ध्येयासाठी सोबत राहतो तो समुह कुटुंब असतो. 
            आता बघा ना, आपण एका घरात राहतो, सुख दुःख एकमेकांसोबत शेअर करतो. म्हणजेच आपण दैनंदिन जीवनासाठी हक्काच्या अश्या लोकांसोबत राहतो. ते बनते आपले कुटुंब.  आता समजा आपल्या कुटुंबातील कुणीतरी शेजारच्या गावात कुस्ती स्पर्धेसाठी गेलाय. अगदी झाडुन सगळा गाव त्या व्यक्तीच्या सपोर्ट साठी येते. कारण तिथे माझ्या गावचा विजय झाला पाहीजे असच सगळ्यांना वाटत असत. मग अशा प्रसंगी ते गाव आपल कुटुंब बनत. देशांतर्गत जेव्हा क्रिकेट खेळ सुरु असतो तेव्हा माझा देश हे माझे कुटुंब बनते. 
             थोडक्यात काय, वसुधैव कुटुंबकम !