ट्रॅफिक सिग्नल वर थांबुन रोड क्रॉस करणाऱ्यांची लगबग पाहण्याची मजा काही औरच असते . काही सेकंद चा खेळ असतो तो. :)
सिग्नल सुटायला काहीच सेकंड होते आणि मी विचार करत होती , आता काही ह्या मुलाला रोड क्रॉस करायला नाही जमणार पण पुढच्याच क्षणी ट्रॅफिक हवालदाराने त्याचा हाथ पकडला अन त्याला रोड च्या दुसऱ्या टोकाला घेऊन गेला.
काहीतरी मोठं मिळवल्याचा आनंद होता त्या मुलाच्या चेहऱ्यावर. छान हसुन धूम ठोकली पट्ठ्यानं. इकडे जराही विलंब नं करता ट्रॅफिक हवालदार परत आपल्या ड्युटीवर रुजू पण झाला होता.
हे सगळं बघुन मी मात्र जाम खुश झाली होती. म्हणतात ना दररोज काहीतरी इन्स्पिरेशन हवं असतं आपल्याला, आज ते मला ट्रॅफिक सिग्नलवर भेटलं होता. :)
- सौजन्य
पुणे ट्रॅफिक पोलीस